
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते मनोहरराव गये यांचे निधन
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
बोर्डी येथील प्रतिष्ठित नागरिक, नागास्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष, श्री गुरुदेव विद्या मंदिर बोर्डीचे अध्यक्ष, श्री गुरुदेव सेवा मंडळ बोर्डीचे अध्यक्ष, अकोट जिनिंग प्रेसिंग सहकारी फॅक्टरीचे उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ सहकार नेते मनोहरराव शांतारामजी गये यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.मनोहरराव गये यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना दिशा मिळाली. त्यांच्या निधनामुळे बोर्डी परिसरासह संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांचा अंत्यविधी आज बोर्डी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी बोर्डी ग्रामस्थांच्या वतीने, सहकार परिवाराच्या वतीने तसेच अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, सुना, मुलगा, मुलगी, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.भावपूर्ण श्रद्धांजली”समाजसेवा, शिक्षण आणि सहकार क्षेत्रासाठी आयुष्यभर योगदान देणारे मनोहरराव गये यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.”
