
जि. प. शाळा लोहारी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील जि. प. शाळा लोहारी खुर्द येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.बँडच्या तालावर विविध घोषणा देत हातात तिरंगा घेतलेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेत आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. मुख्याध्यापक नितीन धोरण यांच्या हस्ते शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजारोहण सरपंच पुजाताई म्हैसने यांनी केले. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच पुजाताई म्हैसने ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश वानखडे, अतुल म्हैसने, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल ठाकरे , वैशालीताई म्हैसने, अर्चना वानखडे, लता गावंडे, राधेश्याम फुसे, सुप्रिया वानखडे, ग्रामसेवक शैलजा पाटील, नानाभाऊ सपकाळ, प्रफुल्लभाऊ म्हैसने, भीमराव ठाकरे, भाऊराव बोडदे, विश्वास म्हैसने, योगेश डोबाळे, राम म्हैसने, ज्ञानेश्वर खोंड, विपुल ठाकरे, विठ्ठल डोबाळे, पटवारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, कृषीसखी, ग्रामसखी, ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम, राज्यगीत गायन करण्यात आले. त्यानंतर शिक्षिका सोनाली निचळ यांनी सर्व उपस्थितांना तंबाखूमुक्तीची व असाक्षरतेची शपथ दिली. याप्रसंगी प्रविण ठाकरे यांनी आपली आई स्व. दुर्गाताई बाळकृष्ण ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्ग ७ वी तुन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रु ५०० रोख बक्षीस दिले. व दरवर्षी साठी ही योजना सुरू केली. त्यानंतर ज्ञानेश्वर खोंड, राहुल पाचकोर, मयूर गोमासे यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, भाषणे, संगीत कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची व देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन धोरण, सूत्रसंचालन रुपाली ढवळे तर आभार प्रदर्शन कु सोनाली उज्जैनकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भुजिंगराव इंगळे, रमेशभाऊ डिक्कर, अतुल येवतकार, सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
