पळशी सुपो येथे मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; परस्पर तक्रारीनंतर एनसीची नोंद
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद, दि. ७ : तालुक्यातील पळशी सुपो येथे झालेल्या वादप्रकरणी परस्पर तक्रारींची नोंद करण्यात आली असून, दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात जातीय एनसी क्र. 688/2026 दाखल करण्यात आली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष श्रीराम भगत (वय 26), रा. पळशी सुपो यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावात आरोपी संघपाल सोनोने यांनी मागून येत फिर्यादीचा गळा पकडून चापटांनी मारहाण केली. त्यानंतर रविना सोनोने यांनीही मारहाण करत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम 115(2), 352, 351(3) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत एनसी (Non-Cognizable) नोंदविण्यात आली आहे.या प्रकरणात दाखल अधिकारी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जना पाचपोरे यांनी नोंद केली असून, पोहेकॉ तयब अली हे पुढील तपास करीत आहेत. तसेच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन बागुल व पोलीस उपनिरीक्षक पंडीत यांनी भेट दिली.दरम्यान, याच घटनेसंदर्भात यापूर्वी दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीवरूनही गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्पर आरोप करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.