
विजय अंभोरे कडून शिरपुरात मोफत पाणी वाटप
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
तालुक्यातील शिरपूर जैन हे पंचवीस हजार लोक वस्तीचे गाव असून 17 सदस्य ग्रामपंचायत आहे. मात्र येथे या वर्षीच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने क्रांती पॅनल तर्फे येथील समाजसेवक विजय अंभोरे यांनी आपल्या स्वखर्चातून टँकरद्वारे नागरिकांना पाणी वाटप करत आहेत. शिरपूर जैन हे जैनांची काशी व हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून ही या गावाकडे पाहायला जाते मात्र येथील सदस्य 17 सदस्य ग्रामपंचायत असूनही एकनाथ धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी चारही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. येथे बोराळा येथील धरणावरून दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो . मात्र यावर्षी धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने शिरपूर वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिरपूरवास्यांना पाणी टंचाई जाणवू नये म्हणून येथील समाजसेवक विजय निवृत्ती अंभोरे यांनी आपल्या स्वखर्चातून विनामूल्य नागरिकांना टँकरद्वारे पाणी वाटप करीत आहेत. नागरिकांना त्यांनी ज्यालाकोणाला पाण्याची आवश्यकता असेल त्यांनी

आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले असून या पाणी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज क्रांती पॅनलचे अध्यक्ष अशोक अंभोरे यांच्या हस्ते वार्ड क्रमांक चार मधून करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला विजय अंभॊरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व वार्ड क्रमांक चार मधील नागरिक व क्रांती पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
