आकोडे काढले; तरीही केळी तलावातून पाणी उपसा

आकोडे काढले; तरीही केळी तलावातून पाणी उपसा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-( अनिल जाधव)

दि,११:- शहरालगत असलेल्या केळी तलावात आज रोजी फक्त मृत जलसाठा शिल्लक असताना, तलावातून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.येत्या काही दिवसात तलाव कोरडा पडून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. असे वृत्त वर्तमानात पत्रातमध्ये झळकताच विज वितरण कंपनीने विजेच्या तारांवरचे अवैध वीज वापराचे हूक काढून टाकले.परंतु जलसिंचन विभागाने अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याने तलावातून पाण्याचा उपसा सुरूच आहे. या तलावातून पाणी उपसा सुरू असल्याने मृत जलसाठा यापेक्षा अत्यल्प जलसाठा उरला आहे.त्यामुळे गाडगे बाबा नगरमधील बोअरवेल आटल्या आहेत.काही अखेरची घटका मोजत आहे.तेव्हा आता तरी जलसिंचन विभागांच्या जागे होऊन पाणी उपसा बंद करावा अशी मागणी शहा फकिर यांनी जलसिंचन विभागाला लेखी पत्र देऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *