
पोलिसाची दबंग कारवाई आरोपी अवघ्या दोन तासात अटक व चोरीस गेलेले ४६००० रुपये जप्त
कारंजा (घाडगे): कारंजापोलिसांनी अवघ्या दोन तासात चोरीचा छडा लावला, चोरट्यास अटक करून रोकड जप्त केली.कारंजा (घाडगे) येथे नरेंद्र राजारामजी मोटघरे यांचे कृषी सेवा केंद्राचे दुकान आहे. तळेगाव बस स्टॉप येथून बस मध्ये बसून कारंजा ला येत असताना अज्ञात इसमाने त्याच्या खिशातील ४६००० रुपये काढून घेतले. अशी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी तात्काळ तपास पथक तयार करून आरोपी अवघ्या दोन तासात अटक केली व चोरीस गेलेले ४६००० रुपयेजप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन, पोलीस उपनिरीक्षक सतीश जायभाय, पोलीस हवालदार निलेश मंडारी, पोलीस शिपाई दिनेश घसाड, आशिष कालोकार अमोल गानमोडे. समाधान पांडे यांनी केली. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
