
जिजाऊंच्या लेकींनी केले सावित्रीमाईंना अभिवादन
सहसंपादक जावेद शह
03जानेवारी.राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, दरवर्षीप्रमाणे 3 जानेवारी हा दिवस जिजाऊ ज्ञान मंदिरातमध्ये महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरी राजपुत या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षक विशाल काळवाघे तसेच सहाय्यक शिक्षिका शीतल पाटील यांची उपस्थिती होती.* *सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर लगेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.* *यावेळी यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या गीतातून व भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका प्रियंका सरकटे,शीतल पाटील, यांनी आपल्या भाषण व गीतातून विचार व्यक्त केले.* *अध्यक्षीय भाषणामध्ये माधुरी राजपुत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत, आजच्या जिजाऊंच्या लेकींनी उच्च शिक्षीत होत अधिकाधिक ज्ञान संपादन केले पाहिजे, असे आपल्या भाषणात सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान कु. आचल धनावत हिला मिळाला. कार्यक्रमानंतर सर्व शिक्षक शिक्षीका बनलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे कामकाज दिवसभरासाठी हाताळले.* *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राची हिवाळे हिने व वैष्णवी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतना सोनुने हिने केले.* 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
