मलकापूर शिवसेना उबाठाचा एक कॉल प्रॉब्लेम सोल्व चा प्रत्यय मोताळा वासियांना.

मलकापूर शिवसेना उबाठाचा एक कॉल प्रॉब्लेम सोल्व चा प्रत्यय मोताळा वासियांना.

प्रतिनिधी नागेश सुरगे

आज दिनांक २३/१२/२४ रोजी मौजे पिंपरी गवळी ता. मोताळा येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर शिरसागर व इतर कास्तकारांनी विद्युत डीपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी मलकापूर शिवसेना उबाठा तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांना फोनवर संपर्क केला व सदर हकीकत सांगितली, त्यांनी सर्वाँना तातडीने कार्यकारी अभियंता मलकापूर येथील कार्यालयावर बोलून घेतले. तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या सह शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन चांडक डिपी च्या शेजारी 100 kV ची अतिरिक्त डीपी मंजूर करण्यासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यास भाग पाडले. आणि तसेच सद्याचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून शेजारील डीपी वरून तात्पुरती व्यवस्था करून देण्याबाबत आदेश दिला.*तसेच ७ महिन्याआधी स्व. गुणवंत विश्वनाथ सांघवे वायरमेन रा. लिहा* यांचा मूर्ती येथे कर्तव्यावर असताना दुर्देवी मृत्यू झाला होता. परंतु मागील ७ महिन्यात महावितरण तर्फे त्यांच्या परिवाराला कुठलाही शासकीयलाभ मिळण्याबाबत सहकार्य मिळाले नव्हते, याबाबत श्रीकांत सांघवे यांनी देखील तालुका प्रमुखांना संपर्क केला. त्यांच्या भावाचा बाबतचा उपरोक्त प्रस्ताव २ दिवसात मार्गी लावण्याबाबत देखील ढोले साहेबांनी आश्वस्त केले.यावेळेस उपकार्यकारी अभियंता श्री ढोले साहेब यांनी सदर सर्व प्रश्न निकाली काढण्याकरिता विशेष सहकार्य केले व सर्व प्रश्न मार्गी लावले.यावेळी ज्ञानेश्वर क्षीरसागर मा. सरपंच पिंपरी गवळी, श्रीकांत सांघवे, शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र काजळे, नासीर शेख, जुबेर भाई, मंगेश संबारे, यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *