संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने बुलढाणा जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

संभाजी ब्रिगेड बुलढाणाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांना पक्षाने जिल्हा मेळावा घेण्याची जवाबदारी सोपविली होती. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत अमर पाटील यांनी तात्काळ जिल्हा दौरा काढत नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांचा भेटीगाठी घेऊन सर्वांना मेळाव्याला येण्याची विनंती केली आणि ४ दिवसांत ठरलेल्या मेळाव्याला नांदुरा, मोताळा, मलकापूर, जळगांव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगांव या उत्तर बुलढाणा जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे शेकडो कट्टर मावळे एकवटले. विशेष म्हणजे सर्वत्र अक्षरशः ढगफुटी सदृश्य परिस्थिती असताना, सोयाबीनला पावसाचा जोरदार तडाखा व गाव-गावांत देवी उत्सवाचे भंडारे असतांनाही जोराचा पाऊस, वारा पार करत सर्व आव्हानांना तोंड देत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जिल्हा मेळाव्याला उपस्थित राहिले हे विशेष.

या जिल्हा मेळाव्याला अध्यक्ष म्हणून

प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी तर उद्घाटक म्हणून विभागीय अध्यक्ष गजानन भोयर लाभले. तसेच या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रेमकुमार बोके हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले व त्यांनी लोकशाही जागर व संभाजी ब्रिगेड का? कशासाठी या विषयाबद्दल विस्तृत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील, मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, मराठा सेवा संघ नांदुरा तालुकाध्यक्ष भगवान सोयस्कार सर प्रमुख उपस्थितीत तर विर भगतसिंग विद्यार्थी परिषद

मा. जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख सर, माँ जिजाऊ सावित्री विचार मंचचे संस्थापक अशोकराव घनोकार भागवतराव मुंडे, ईश्वर पांडव हे विशेष उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला लाभले.

२९ सप्टेंबर रोजी अमर पाटील यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ खेडेकर यांनी जाहीर कार्यक्रमात घोषणा केली होती व १३ ऑक्टबर रोजी आयोजित जिल्हा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांनी पत्र पाठवून अमर पाटील यांच्या जिल्हाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब करण्यात

आला नंतर अमर पाटील यांनी लगेच रिक्त असलेली जिल्हा कार्यकारणी व रिक्त असलेल्या तालुका कार्यकारण्या गठीत करून प्रदेश कार्यकारणीच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र वितरित केले.

यामधे जिल्हा सचिव पदी मंगेश सोळंके यांची फेर निवड, तर जिल्हा उपाध्यक्ष पदी अॅड. राहुल वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सुनील संबारे, जिल्हा कायदे सल्लागार पदी अॅड. पवन चव्हाण, जिल्हा प्रवक्ते पदी संदीप रायपूरे, जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे, जळगाव जा. तालुकाध्यक्ष पदी रामा रोठे यांची फेरनिवड, नांदुरा तालुकाध्यक्ष पदी दिलीप कोल्हे, मलकापूर तालुकाध्यक्ष पदी राहूल संबारे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी पवन सोळंके यांची फेर निवड अशा सक्षम पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यावेळी शेकडो युवकांनी संभाजी ब्रिगेडमध्ये पक्षप्रवेश घेतला व हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *