
बाळासाहेब नेरकर प्रतिनिधी अकोटः वारकरी कीर्तनकार प्रबोधनकार यांचे संत संमेलन मंगळवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता श्री क्षेत्र श्रद्धासागर दर्यापूर रोड आकोट येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ह भ प वासुदेव महाराज महल्ले (अकोला) प्रमुख अतिथी म्हणून हभप शिरीष महाराज मोरे( देहू) ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ (वारी) ह भ प महंत दासगिरी महाराज (अंबोडा) व ह भ प शामसुंदर निचीत महाराज, संयोजक संत विमर्श विदर्भ प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळ (अमरावती), प्राध्यापक सुभाषजी लोहे संत विमर्श संयोजक महाराष्ट्र राज्य कॅप्टन सुनील जी डोबाळे ,यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे
संमेलनाचे उद्घाटन सत्र -विषय धर्म रक्षण संस्कृती रक्षण व देश रक्षण ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ द्वितीय सत्र- विषय वारकरी संप्रदाय व समाज प्रबोधन हभप वासुदेव महाराज महल्ले व कार्यक्रमाचे समारोप विषय- मुक्त संवाद विषय मांडणी प्राध्यापक सुभाषजी लोहे घेणार आहेत तरी सर्व वारकरी किर्तनकार-प्रबोधनकार कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन वारकरी कीर्तनकार प्रबोधनकार संम्मेलनचे आयोजक कॅप्टन सुनील डोबाळे अध्यक्ष आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
