
जळगांव तालुक्यात युवासेनेचा झंझावात.युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषिभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा युवासेनेते प्रवेश
प्रतिनिधी.जळगांव जामोद:- संवाद शिवसेनेचा संकल्प महविजयाचा दौऱ्यानिमित राज्यात सर्वत्र शिवसेनेचा झंझावात सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन.आज जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील असंख्य युवकांनी युवासेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी सर्वांचे युवासेनेत स्वागत करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी “संवाद शिवसेनेचा संकल्प महाविजयाचा” दौऱ्यानिमित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अनेक योजना घराघरात पोहचविण्याचे काम युवासेना करणार आहे यामध्ये,शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना , कामगार बांधव व महिला यांच्यासंदर्भात बांधकाम कल्याणकारी मंडळ मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना, मुख्यमंत्री तिर्थ यात्रा योजना युवकांच्या संदर्भात रोजगारासाठी कार्यान्वित सर्व योजनांची माहिती आता युवासेनेच्या माध्यमातून घरा घरात पोहचविण्याचे काम जोरात सुरू असून यामध्ये आतापर्यंत हजारो लाभार्थी यांना लाभ देण्यात आला आहे व पुढेही भविष्यात सतत सुरू राहील असे प्रतिपादन व मार्गदर्शन यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.श्री.ऋषिभाऊ जाधव* यांनी केले .यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख कपिल चोपडे,संग्रामपूर युवासेना तालुका प्रमुख ईश्वर पवार, उपतालुका मंगेश टाकसाळ, नकुल यादगिरे, , प्रशांत मोरखडे , प्रदीप कळसकर, मेहमूद खान, आकाश कराळे, चेतन उगले, अंकित चौधरी तथा युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी सेना तालुका प्रमुख पदी आकाश तेलग्रे, जामोद शहर प्रमुख सोपान वानखडे,उपशहर प्रमुख गोपाल केदार,युवा सेना जि. प सर्कल प्रमुख पंकज फुसे,प्रतिक केदार युवासेना जामोद विभाग प्रमुख, जळगांव उपशहर प्रमुख पदी मेहमुद खान, अंकित चौधरी तर तालुका चिटणीस पदी आकाश कराळे , रोशन पदमने, रामा घाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली
