
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने मिंदे सरकारचे केले श्राद्ध..दिले राज्यपालांना रक्ताच्या सह्याचे निवेदन…शेतकरी द्रोही खोके सरकारचे करणार विसर्जन – महाविकास आघाडीत एकमताने सुर–
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे जळगाव जामोद येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने मिळून मिंदे सरकारचे सर्वपित्री अमावस्येच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक १ आक्टोंबर २०२४ रोजी श्राद्ध घालुन पिंडदान करीत अनोखे आंदोलन केले.या अनोख्या आंदोलनाची संकल्पना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर यांची होती. यावेळेस आघाडीच्या घटक पक्षांनी पाठींबा देऊन उपस्थिती दर्शविली व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रक्ताच्या सह्यानचे निवेदन आपल्या विविध मागण्या सह सादर केल्या.महायुती शासनाच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्येकात्मक फोटो मंडपात लावून त्याला माल्या अर्पण करीत पिंडदान करीत श्राद्ध केले उपस्थित सर्वांनी निवेदनावर रक्ताने सह्या करून ते निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदनामध्ये नमूद केले की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे उत्पादित शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली पाहिजे उत्पादित शेतकरी मालाला हमीभाव मिळाला पाहिजे नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानाचे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे गोमाल येथे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनचा अनुशेष भरून काढावा या मागण्यासह निवेदन दिले.आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामुख्याने संयोजक अविनाश उमरकर, प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेंनजित पाटील, प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, प्रकाश पाटील, ज्योतीताई ढोकणे, शैलेन्द्र पाटील, शिवाजीराव बुरुंगले , अशोक हिंगणे, दीपक सलामपुरीया, राजेश्वर देशमुख, उबाठा चे तालुकाध्यक्ष गजानन वाघ, माजी सभापती साबीर तडवी, डॉ वाकेकर, अमर पाचपोर कैलास बोडखे, अंबादास बाठे, प्रविण भोपळे, समाधान दामधर, तुकाराम काळपांडे,आसिफ इकबाल, बाबु जमदार, दादा पाटील, राजीव घुटे,मारोती सुरळकर, राजेंद्र वानखडे अर्जुन घोलप, रमेश ताडे, स्वप्निल देशमुख, प्रकाश शेगोकर, जाहेर अली, निशीकांत देशमुख, अमोल वसतकार, गजानन साबळे, सुहास वाघ,अझहर देशमुख, ऍड मोसीन खान, शिवा धनोकर, राजिक शेख, देविदास इंगळे, मंशुम, मिलिंद वानखडे सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

