मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी शेगावात

प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून ते रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी 3 वाजता श्री. संत नगरी शेगाव येथे येणार आहेत. त्या संदर्भात जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी दि.18 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन संदर्भात जळगाव जामोद

येथील विश्रामगृहावर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती. राजसाहेबांचे मनसेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून स्वागतानंतर यावेळी ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा संवाद साधनार आहे. तरी सर्वांनी शेगाव येथे अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन मनसे शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *