माजी शहराध्यक्ष शेख जावेद यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकार्याची राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षात घरवापसी

प्रतिनिधी जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट ) जिल्हा सरचिटनीस तथा माजी शहराध्यक्ष शेख जावेद यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षात घरवापसी झाली. आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समिती जळगांव जामोद सभागृहात जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर तथा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या उपस्थितीत झालेल्या जळगाव जामोद तालुका व शहरच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने शेख जावेद यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटनीस संदीप ढगे, शहर उपाध्यक्ष संजय दंडे, युवा नेते सैय्यद वसीम, सैय्यद सलीम, युवक शहर उपाध्यक्ष शेख शोएब, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई राजपुत,शे.सोहेल, शे.सादिक, शेख ईरफान, सैय्यद जाकीर, सैय्यद राशीद, बिस्मिल्लाह खान, शेख आरिफ, सैय्यद सकाउद्दीन, शेख साहिल, अहेमद खान यांच्या सह वडगाव पाटण येथील भाजपा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्रजी घुले यांचा सुद्धा पक्ष प्रवेश पार पडला. बुलढाणा जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघाची मागणी पक्षाकडे केली असुन जळगाव जामोद मतदारसंघ त्यामध्ये क्रमांक 1 ची मागणी केलेली आहे त्यादृष्टीने विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांनी उपस्थिताना केले. यानंतर शेख जावेद यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सदर बैठकीस विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ,ईरफान खान,पराग अवचार, एम.डी. साबीर, मनोहर वाघ, वर्षाताई वाघ, आशिष वायझोडे,विठ्ठल घुले,अजहर पटेल, एकनाथ ताठे, अरुण बावस्कार,निजाम राज,राम वाघ, मंगल डोंगरदिवे, दादाराव धांदर, योगेश कुवर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *