गल्ली ते दिल्ली मेडिकल कडकडीत बंदला तालुक्यात चांगला प्रतिसाद.किन्हीराजा ११ मेडिकल बंद

गल्ली ते दिल्ली मेडिकल कडकडीत बंदला तालुक्यात चांगला प्रतिसाद.; किन्हीराजा ११ मेडिकल बंद

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

आजच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या देशव्यापी बंदला शहरासह तालुक्यातील किन्हिराजा, शिरपूर, मेडशी, जऊळका रेल्वे ,अमाणवाडी, केनवड येथील मेडिकल विक्रेत्यांनी शंभर टक्के बंद पाळला. ऑनलाईन औषधी गोळ्यांच्या विक्रीतून जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून बोगस औषधीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे बोलल्या जात आहे. अशा ऑनलाईन वीक्रीच्या बोगस विक्रीच्या केंद्रावर मुंबईत अलीकडेच कारवाही झाली डाॅक्टरांच्या चिठ्ठीशीवाय जे औषध विक्री करता येत नाही तीच औषधी ऑनलाईन घरपोच मीळत आहे. त्यामुळे ग्रामीण मेडिकल व जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या साठीच आज देशांतील मेडिकल एक दिवस बंद ठेवून जनतेच्या आरोग्यासाठी आजचा बंद होता. तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील किन्हिराजा येथील ११ मेडिकल ने या बंद मध्ये सहभाग नोंदवील्याची माहिती मेडिकल चे

संघटनेचे माणिक पाटील चौधरी व जियाउद्दीन कुरेशी यांनी दीली आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली पर्यन्त आजचा बंद पाळण्यात आला आहे. मेडिकल लाईन मध्ये अनेक बदल झाले गर्भपात, झोपेच्या गोळ्या सह अनेक उतेजीत करणाऱ्या व शक्तिवर्धक गोळ्याची ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून ह्या औषधीचा ऑनलाईन धुमाकुळ सुरू झाला आहे. त्याचेवर कोणाचेही नीयंत्रण नाही मात्र प्रत्यक्ष मेडिकल स्टोअर्सला साधी झोपेची गोळी देण्याचा अधिकार नाही. त्याचे रेकाॅड ही नियमीत ठेवावे लागते, परंतू ऑनलाईन खरेदी मध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या जात असून बोगस गोळ्यांच्या व औषधीचा गोरखधंदा हा ऑनलाईन बीनबोभिटपणे चालु आहे. त्यामुळे बोगस औषधीचा वापर मोठ्या प्रमाण वाढले असुन या खरेदी त्वरीत बंद कराव्या यासह विविध मागणी साठी आज देशव्यापी संपात किन्हीराजा येथील माणिक पाटील चौधरी, जियाउद्दीन कुरेशी, पंडीतराव घुगे, चेतन वानखेडे, मनोज गायकवाड, प्रशांत घुगे, राजू काळुशे, महादेव काळुशे, रवि वानखेडे यासह किन्हीराजा येथील ११ मेडिकल चालक आजच्या संपात सहभागी झाले व आजचा बंद शांततेत यशस्वी पार पाडला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *