अमानी येथील संत गजानन महाराज संस्थान जवळ पारायण वाचन व उसळ फराळ वाटप

अमानी येथील संत गजानन महाराज संस्थान जवळ, पारायण वाचन व उसळ फराळ वाटप

मालेगांव जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव )

मालेगाव तालुक्यातील अमानी येथील संत गजानन महाराज संस्थान जवळ दरवर्षी प्रमाणे यंदाही पण महाशिवरात्री निमित्त पारायण वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,व नंतर शाबुदानाची उसळ फराळ वाटप करण्यात आला, अमानी येथे संत गजानन महाराजांचे मंदिर असून येथे दरवर्षी प्रमाणे संस्थान च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते,आज महाशिवरात्री निमित्त पांगरी नवघरे येथील सौ शोभा नंदु नवघरे यांनी पारायण वाचन केले, त्यांच्या सोबत गावातील महिला,सेवा धारी यांनी देखील पारायण वाचन केले, त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने आयोजित उसळ फराळ वाटप करण्यात आला, पारायण वाचन व उसळ आणि दर्शनाचा लाभ गावातील भावीकांनी मोठ्या संख्येने घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *