७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जळगाव-जामोद येथे अभाविपची 500 फूट भव्य तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न

७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जळगाव-जामोद येथे अभाविपची 500 फूट भव्य तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

जळगाव-जामोद (15 ऑगस्ट) – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे जळगाव-जामोद येथे 500 फूट लांबीच्या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय येथून यात्रेला सुरुवात झाली. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागासह ही यात्रा देशभक्तीपर घोषणाबाजी करत शहरभर काढण्यात आली. सुमारे 500 फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण घोषणांनी वातावरण भारावून टाकले. या वेळी शहरातील नागरिकांनीही ठिकठिकाणी स्वागत करून यात्रेची शोभा वाढवली.या प्रसंगी अभाविप खामगाव जिल्हा संयोजक शुभम राजपूत, सहसंयोजक सानिका राठोड, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख संकेत वानखेडे, जिल्हा गतीविधी प्रमुख शुभम राठोड, जिल्हा जन व अर्थ संपर्क प्रमुख ऋषिकेश वाघमारे, जिल्हा विद्यार्थी विस्तारक आर्या पाचखेडे, जळगाव नगर मंत्री पूनम भगत, सहमंत्री कपिल शर्मा, भागेश राजोरे, रंजना सातपुते, जानवी सूर्यवंशी, आनंद इंगळे, रितेश ढगे, आचाल धुरडे, वैष्णवी भगत यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.अभाविपच्या या तिरंगा यात्रेने शहरात देशभक्तीची ऊर्जा पसरवली आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अधिक प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *