महाराष्ट्र

सातपुड्याच्या पट्ट्यात स्वागताचा जलवा! बांडा पिंपळच्या ग्रामस्थांनी जिंकली मने २६ मुलींचा कन्या सन्मान

०३ नोव्हें २०२६, ०१:३० सायं.
मराठी समाचार न्यूज २४
बातमीचा फोटो

सातपुड्याच्या पट्ट्यात स्वागताचा जलवा! बांडा पिंपळच्या ग्रामस्थांनी जिंकली मने; २६ मुलींचा कन्या सन्मान, ‘BDL’ उपक्रमालाही सुरुवातआर्थिक परिस्थिती साधारण असली तरी स्वागताचा उत्साह मात्र सिरजोर! गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

जळगाव जामोद (प्रतिनिधी) :

सातपुड्याच्या पट्ट्यात शिक्षण, विद्यार्थी सन्मान आणि सामाजिक उपक्रमांची एक वेगळीच चळवळ पाहायला मिळत आहे. विद्यार्थिनींच्या सन्मानाला प्राधान्य देत राबविण्यात येणाऱ्या ‘कन्या सन्मान’ उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बांडा पिंपळ (ता. जळगाव जामोद) येथील ग्रामस्थांनी आपल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने सर्वांची मने जिंकली.गेल्या तीन दिवसांत जळगाव जामोद नगर परिषद क्षेत्रातील २७, जिल्हा परिषद असलगाव येथील १५ आणि जिल्हा परिषद बांडा पिंपळ येथील २६ अशा एकूण ६८ मुलींचा कन्या सन्मान करण्यात आला. यासोबतच तीन ठिकाणी ‘ब्रेन डेव्हलपमेंट लायब्ररी’ (BDL) या उपक्रमाची प्राथमिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, बौद्धिक क्षमता आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.बांडा पिंपळ येथे आयोजित कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्री. श्रीकांत जोशी, केंद्रप्रमुख श्री. नितीन सातव, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, गावचे प्रमुख, सन्मान परिवाराचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे, बांडा पिंपळ गावाची आर्थिक परिस्थिती भलेही साधारण असेल; मात्र पाहुण्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी दाखवलेला उत्साह, आपुलकी आणि एकजूट खरोखरच कौतुकास्पद ठरली. गावकऱ्यांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून उपस्थित भारावून गेले. ‘आर्थिक परिस्थिती कमजोर असली तरी स्वागतामध्ये मात्र बांडा पिंपळकर सिरजोर!’ अशी भावना या सोहळ्यातून व्यक्त झाली.कार्यक्रमातील सर्वाधिक आनंदाचा क्षण म्हणजे सन्मानित झालेल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील समाधान आणि उत्साह. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाला मनापासून पाठिंबा दिला.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. विशेषतः विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.कन्या सन्मानातून मुलींच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन आणि ब्रेन डेव्हलपमेंट लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारा हा उपक्रम ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. सातपुड्याच्या पट्ट्यात शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि ग्रामस्थांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याचे बांडा पिंपळने एक सुंदर उदाहरण घालून दिले आहे.

ही बातमी शेअर करा: