वाशीम येथे १७ व्या अग्रो व्हिजन कृषी प्रदूशनाच्या संदर्भात बैठक

वाशीम येथे १७ व्या अग्रो व्हिजन कृषी प्रदूशनाच्या संदर्भात बैठक
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
माजी आमदार ॲड. विजयराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली* वाशिम येथे चौपाल सागरजवळील हॉटेल रामराज येथे आगामी १७ व्या अँग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून दिनांक २७ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित होणाऱ्या या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण शेती पद्धती, कृषीविषयक संशोधन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती मिळणार आहे.या बैठकीस वाशिम जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी तसेच अँग्रोव्हिजन फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विषयांवर चर्चा करून नियोजन करण्यात आले.**वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान व नव्या संधींची माहिती जाणून घ्यावी आणि या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.**शेतकऱ्यांची प्रगती, आधुनिक शेतीचा स्वीकार आणि कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास यासाठी अँग्रोव्हिजनचा हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे!