दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सेवानिवृत्त शिक्षकांची पाच हजार रुपयांची मदत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सेवानिवृत्त शिक्षकांची पाच हजार रुपयांची मदत.
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव),
ता.३महाराष्ट्रात पावसाने दीर्घ खंड दिल्याने मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर मात करण्यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कपात करून ती रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत किन्हीराजा येथील वसंतराव उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक
देवेंद्रसिंग राजपूत हे सेवानिवृत्त झाले असूनही आपली जबाबदारी समजून त्यांनी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ५००१ रुपयांचा धनादेश मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून दिला आहे.प्रा राजपूत यांच्या या सहकार्याचे अनेक मित्र मंडळाने स्वागत केले आहे.