दीन-दुबळ्यांच्या घरी, आनंदाचा दिवा लावू भुकेलेल्यांना अन्न देऊन, खरा सण साजरा करू

दीन-दुबळ्यांच्या घरी, आनंदाचा दिवा लावू ….
भुकेलेल्यांना अन्न देऊन, खरा सण साजरा करू ….
उमाळी येथील भागीरथी बोचरे वय 80,गाव उमाळी यांना किराणा किट भेट म्हणून देण्यात आली.
जाणीव वतीने दरवर्षी देवी ची ओटी समजून निराधार किंवा गरजू महिलांना किराणा किट कपडे भेट म्हणून देण्यात येतात या उपक्रमासाठी जाणीव चे योगेश वर्मा,नंदू जाधव,राजेश मोडक,स्वप्नील वाघमारे,निता वायकोले, शिवा कडुकार,विजय अंबाडकर,मनोज यादव यांचे योगदान लाभले यावेळी जाणीव वतीने लता ताई राऊत व प्रांजली धोरण यांनी महिलेची भेट घेतली व होईल तो मदत करू असे सांगितले.समाजातील प्रत्येक घटकाला प्रेम, आपुलकी आणि सन्मान मिळावा, हाच या उपक्रमामागील प्रामाणिक हेतू आहे आपली छोटीशी मदत, कोणाच्या तरी आयुष्यात मोठा आनंद निर्माण करू शकते! - प्रांजली धोरण
अध्यक्षा
जाणीव बहुद्देशीय फाऊंडेशन
9970402819