जाणीव फाऊंडेशन वतीने माणुसकीचा दीपोत्सव माणुसकीची दिवाळी, आनंदाची दिवाळी!शांतीवन कृष्ठधाम

जाणीव फाऊंडेशन वतीने माणुसकीचा दीपोत्सव माणुसकीची दिवाळी, आनंदाची दिवाळी!
शांतीवन कृष्ठधाम:
१ नोव्हेंबर २०२६ दिवाळी सणाचे औचित्य साधून कुष्ठरोगी बांधवांना सोलापुरी चादर, फळे, बिस्किटे व मिठाई वितरीत करण्यात आली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
मधुमती राजेश मोडक यांचे वाढदिवस व दिवाळी असे दुग्धशर्करा योग साधत रुग्णांना १० सोलापूरी चादर वितरित केल्या. जाणीव वतीने फळ व मिठाई वितरित करण्यात आली.यावेळी जाणीव वतीने राजेश मोडक सर,विशालसिंह गौर सर,सुनील नाफडे सर, ॲड. सतीश भिसे पाटील, प्रांजली धोरण तसेच कृष्ठधाम येथील डॉ.पंकज पाटील व कर्मचारी उपस्थित होते.ह्या सेवेतून समाधान मिळत राहावे व माणुसकीचा सुगंध दरवळत रहावा हाच उद्देश माणुसकी जपूया, आनंद वाटूया!