अकोट व तेल्हारा आगारात १० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण!

अकोट व तेल्हारा आगारात १० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण!
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोट आगाराला ५ व तेल्हारा आगाराला ५ अशा एकूण १० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध झाल्या आहेत.दि. ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा मा. आमदार श्री. प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.यावेळी परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक सौ. सुतवणे मॅडम, अकोट, तेल्हारा व हिवरखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, भाजप मंडळ अध्यक्ष, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवीन बसेसमुळे अकोट व तेल्हारा तालुक्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सुविधाजनक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.