महाराष्ट्र

डॉ. शिरेकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

२० ऑक्टो २०२६, ०५:४२ सायं.
मराठी समाचार न्यूज २४
बातमीचा फोटो

डॉ. शिरेकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…जळगाव तालुक्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांना हजारोंची रोख बक्षिसे..

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी

जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सतीश प्रल्हाद शिरेकार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते… ‘धावूया आरोग्यासाठी; घडवूया निरोगी समाज!’ हा संदेश देणाऱ्या या स्पर्धेत महिलांसाठी 3 किलोमीटर, तर पुरुषांसाठी 5 किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते…
स्पर्धेचा प्रारंभ दुर्गा चौकातून करण्यात आला …
महिला गटाचा मार्ग मुंदडा पेट्रोल पंपा पासून तर पुरुष गटाचा मार्ग आयटीआय कॉलेज, जळगाव जामोद–नांदुरा रोड असा निश्चित करण्यात आला होता…
स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येकी महिला व पुरुष गटासाठी वेगवेगळे प्रथम क्रमांकासाठी ७,७७७ रुपये, द्वितीय ४,४४४, तृतीय ३,३३३, चौथा २,२२२ आणि पाचवा क्रमांक मिळविणाऱ्यास १,१११ ,सहावे बक्षीस 1000, सातवे बक्षीस 1000, आठवे बक्षीस 1000, नववे बक्षीस 1000 , दहावे बक्षीस 1000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. तर स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले असून, युवक-युवती आणि नागरिकांनी या आरोग्यविषयक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शवून ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली..
यावेळी जळगाव मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष गजानन वाघ ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रकाशशेठ ढोकणे, अविनाश उमरकर, एडवोकेट संदीप उगले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, प्रकाश भाऊ वाघ , नानासाहेब कांडेलकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे आयोजन पंजाब म्हसळ व डॉ. शिरेकार साहेब मित्र परिवार जळगाव जामोद यांनी केले.या स्पर्धेला डॉ.डाबरे ,सोमेश आस्वर,हरीश शर्मा,प्रमोद येऊल राऊत सर आणि इतर शिक्षक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ही बातमी शेअर करा: